देशभारतमुख्यपानसामान्य ज्ञान

उत्तराखंड मधील बोगद्यातील बचावकार्याला यश ; ४१ मजुरांची १७ व्यादिवशी सुखरूप सुटका

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात मंगळवारी यश आले.  बोगदा कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर तब्बल १७ दिवस अंधारात अडकलेल्या या मजुरांनी मोकळा श्वास घेतला. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करून मजुरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यानंतर चाके असलेल्या स्ट्रेचरच्या मदतीने मजुरांना बाहेर काढण्यात आले.

१२ नोव्हेंबरला चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), उत्तराखंडचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) यांच्यासह अनेक यंत्रणांच्या हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना मंगळवारी यश आले. संध्याकाळी चारच्या सुमारास मजुरांच्या अगदी जवळ पोहोचण्यात यश आल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य लेफ्ट जनरल (निवृत्त) सय्यद अता हस्नैन यांनी जाहीर केले. त्यावेळी दोन मीटरचे खोदकाम शिल्लक होते. नंतरच्या तीन ते चार तासांत हे काम पूर्ण झाले व आठच्या सुमारास पहिला मजूर बाहेर आला. त्यानंतर एकेक करून सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यावेळी (पान ४ वर) (पान १ वरून) बोगद्याजवळ उपस्थित होते. त्यांनी बाहेर आलेल्या मजुरांची विचारपूस केली. त्यानंतर या मजुरांना रुग्णवाहिकांमधून ३० किलोमीटर अंतरावरील विशेष रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना ४८ ते ७२ तास वैद्याकीय निरीक्षणाखाली ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. सर्व मजुरांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती धामी यांनी दिली.

गेला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!