देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ


लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- २४/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ४२
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
स्वातंत्र्य = स्वातंत्र्य म्हणजे जो स्वतंत्र व्यक्ती आहे त्याला आपल्या जीवनात विकास व प्रगती करायची असेल तर स्वातंत्र्य महत्वाचे आहे.स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे जो व्यक्ती नैतिक मुल्य जपतो तो स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करतो.तो आपल्या जीवनात योग्य विकास व प्रगती करतो.स्वैराचारी व्यक्ती जीवनात कशाही प्रकारे वागून आपल्याला मिळालेल्या जीवनाचा व आयुष्यातील वेळेचा दुरूपयोग करून अधोगतीला जात असतो.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात विकास व प्रगती करायची असेल तर पुढील प्रमाणे स्वातंत्र्याची आवश्यकता भासते.विचार स्वातंत्र्य;आचार स्वातंत्र्य; उच्चार स्वातंत्र्य; संचार स्वातंत्र्य; उपजीविकेचे स्वातंत्र्य; शिक्षणाचे स्वातंत्र्य; व्यक्ती विकासाचे स्वातंत्र्य; धर्माचे स्वातंत्र्य.
१) विचार स्वातंत्र्य = माणसाला विचार स्वातंत्र्य असेल तरच तो जीवनात प्रगती करू शकतो.आपल्या प्रगतीशील जीवनाला आकार देणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती आपल्या जीवनातील योग्य सम्यक विचार करण्याची जी आपली कृती आहे ती महत्वाची आहे.
विचार करताना चिकित्सा; तर्क; अन्वेषण व सिद्धता या बाबी महत्त्वाच्या आहेत.या नुसारच आपण योग्य विचाराच्या दिशेने वाटचाल करू शकतो.एक माणूस म्हणून जगत असताना नकारात्मक मानसिक अवस्थेत सुध्दा आपण जगत असतो.त्या म्हणजे लोभ (हाव ; आसक्ती) ; द्वेष व मोह(अज्ञान ) होय.याच्या उलट दानाची भावना; मैत्रीची भावना व प्रज्ञेचा ( शहाणपण ; सत्यतेचे ज्ञान) विकास या सकारात्मक बाबींचा स्वतंत्र व्यक्तीने विचार करून जगणे यालाच आपण खराखुरा स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणू शकतो.
आपण योग्य विचार करतोय का? आपण योग्य व अयोग्य काय आहे ते विचारांच्या माध्यमातून तपासतोय का? चांगल काय आहे व वाईट काय आहे यातील फरक आपण विचारांच्या माध्यमातून समजून घेत आहोत काय? आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीला जे पटते आहे त्याचा स्वीकार विचारांच्या माध्यमातून करतो काय? आपल्यात रुढी; परंपरा; कर्मकांड यांच्यातील फोलपणा बुद्धीच्या कसोटीवर घासून घेऊन त्यापासून सुटका करून घेण्याची आपली स्वतंत्र वृत्ती तयार होते आहे काय? आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून;तपासून घेतलेल्या विचारांशी एकनिष्ठ; प्रामाणिक; तत्वनिष्ठ राहण्याची आपली स्वतंत्र ठाम भूमिका असते काय? जग जरी आपल्या स्वतंत्र विचार करण्याच्या प्रवृत्तीला विरोध करणारे असले किंवा आपले शत्रू होत असले.तरी आपण स्वतंत्ररित्या आपल्या योग्य विचारांची कास सोडत तर नाही ना? व्यक्तीच्या योग्य सम्यक विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे तो स्वतःचा व जगाचा बदल घडवून आणू शकतो. सम्यक विचार ही विचार क्रांती आहे.सम्यक विचार क्रांती मुळे स्वतःचा व जगाचा विकास घडवून आणू शकतो. अनेक महापुरुषांनी आपल्या जीवनात सम्यक विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे जगात क्रांती घडवून आणली हा इतिहास आपल्या समोर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाडचा चवदार तळे सत्याग्रह करतांना समाजाला मार्गदर्शन करतात की; जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा! मग ही जागृती कशाची आहे.तर ती विचारांची जागृती आहे.जे की महापुरुषांनी आम्हाला दिलेली विचारांची देणगी आहे.आपले सम्यक विचार मांडण्यासाठी आपण जीवनात ठाम असले पाहिजे.परंतू आपण इतरांच्या स्वातंत्र्याचा विचार करून सुद्धा इतरांशी वागणे तेवढेच महत्त्वाचे आहे.आपणास जसे आपण स्वतंत्र विचारांचे आहोत असे वाटते. तेव्हा इतरांना सुद्धा वाटते की आपण सुद्धा स्वतंत्र विचारांचे आहोत. म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या स्वातंत्र्याची काळजी घेणे आवश्यक आहे.यालाच सामाजिक नितीमत्ता म्हणतात.
स्वतंत्र विचाराचा माणूस चुकीच्या गोष्टींना ठामपणे विरोध करतो. स्वतंत्र विचाराचा व्यक्ती बहुसंख्याकांच्या चुकीच्या विचारांना विरोध करण्याचे धाडस करतो.जो नीतीमत्तेचे पालन करतो तो सम्यक विचार करूनच जगत असतो.जो व्यक्ती जीवनात चुकीचे विचार करतो तो माणूस जीवनात चुकीचेच आचरण करतो.ज्या रूढी; परंपरा; कर्मकांड युगानुयुगे चालत आले आहे त्याचे आंधळेपणाने आचरण करणे हे पारतंत्र्यच आहे. अशी माणसं ही गुलामगिरीचे जीवन जगत असतात.त्यांच्यातील धैर्य; धाडस व हिम्मत मेलेली असते.ही माणसं अजागृत मनाने आपले जीवन जगत असतात.म्हणजे असे जीवन हे प्राणीलोकांसारखेच असते.
संविधान अनुच्छेद ५१ — क मधील (ज) मध्ये सांगितले आहे की; राज्याने लोकांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण ; मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
स्वतंत्र विचारांच्या व्यक्तीने विचार करताना विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण ठेवून विचार केला पाहिजे.
स्वतंत्र विचारांच्या व्यक्तीने विचार करताना आपल्या हृदयात मानवतावाद ठेवून विचार केला पाहिजे.
स्वतंत्र विचारांच्या व्यक्तीने शोधक बुध्दी ठेवून म्हणजे नव नवीन शोध तसेच नव नवीन ज्ञान व स्वतः चिकित्सक बुद्धी ठेवून शोध घेण्याची प्रवृत्ती वाढवली पाहिजे.
स्वतंत्र विचारांच्या व्यक्तीने आपल्या जीवनात सुधारणावाद स्वीकारून म्हणजे जुन्या जीर्ण झालेल्या रूढी; परंपरा व विषमता यांच्यात स्वतंत्र बाण्याने वागून सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.सातत्याने सूधारणावादाचा ध्यास घेऊन त्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
संविधान अनुच्छेद ५१– क (ज) मध्ये उल्लेख केलेल्या बाबींप्रमाणे समाज गेल्या पंचाहत्तर वर्षांत निर्माण झाला काय ? हा प्रश्न आहे.भारतीय समाज हा रूढी ;परंपरा; कर्मकांड यांचा युगानुयुगे दास असल्याने त्याच बरोबर त्याच्या मनात भयंकर भय असल्याने तो एवढे मानवी विकासाला महत्व देणारे संविधान मिळून प्रगती करू शकला नाही. त्याच्या जोडीला जातीवाद असल्याने जातीय बंधन माणसाला स्वतंत्रपणे विकास करण्यासाठी अडथळा ठरतात. राजकारण; साहित्य; कला;खेळ;शिक्षण व प्रशासन या मध्ये जातीवाद असल्याने या देशातील अनेक हुशार व होतकरू माणसं मागे पडलेली किंवा अडगळीत पडलेले आपणास दिसतील.म्हणजे विषमतावादी व्यवस्था ही मानवाच्या विकासासाठी हानीकारक आहेच.परंतू ती राष्ट्रासाठी सुद्धा हानीकारक आहे.म्हणून भारत हा जगाच्या पाठीवर मागे असलेला किंवा मागे जात असलेला आपणास दिसेल.तेव्हा स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्तीची मोठी जबाबदारी आहे की; राष्ट्र उभारणीसाठी स्वतंत्र व प्रत्येक माणसाला विकास करण्यासाठी स्वातंत्र्याची भुमी निर्माण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य ठरते.

 *****  उर्वरित भाग पुढे  *****
   ‌

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!