दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा

भारताचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी संसदेत प्रश्नउत्तराच्या तासात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा दुष्टबुद्धीने व अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी
तसेच परभणी येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांनी केलेल्या अत्याचार आणि मारहाणीतून झालेल्या खुनाच्या विरोधात ठाणे शहरात 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा बाबत..

महोदय, या निवेदनाद्वारे आम्ही ठाणे शहरातील शिव शाहू फुले आंबेडकर अनुयायांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला असून, वरील विषयाच्या अनुषंगाने निवेदन सादर करून निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत.

  1. देशाचे जबाबदार गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी संसदेच्या सभागृहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा दृष्टबुद्धीने केलेल्या उल्लेखाचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहोत व त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीयांची जाहीर माफी मागावी. तसेच त्यांचा ग्रह मंत्रीपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा
  2. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची जाणीवपूर्वक मोडतोड करणारा श्री दत्ताराव पवार हा अत्यंत जातीवादी असून भरपूर शेती असणारा बागायतदार आहे. त्याला प्रशासनाने अत्यंत चालाखीने माथेफिरू संबोधने हा संबंधित प्रशासनाचा खोडसाळपणा असून या कृतीचा आम्ही तीव्र विरोध करीत आहोत. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या कृतीचा जाहीर निषेध करीत आहोत. भारतीय संविधान ही सर्व कायद्याची जननी असल्याने त्याच्या प्रतिकाची विटंबना करणे हा देशद्रोह आहे म्हणून त्याला देशद्रोहाचेही बी एम एस कलम 152 द्वारे कारवाई करण्यात यावी

3.या प्रकरणात परभणीतील संविधान प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी निषेध आंदोलन करीत असताना येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याने वाहनांची तोडफोड व आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठी चार्ज केला व आंदोलनकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे गुन्हे ताबडतोब काढून टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना आदेश निर्गमित करण्यात यावेत.

  1. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनास जबाबदार पोलीस अधिकारी अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक एलसीबी शरद मरे, पोलीस निरीक्षक नवामोंढा
    पोलिस स्टेशन,कार्तिकेश्वर तुरणर, पोउपनि नवामोंढा पोलीस स्टेशन परभणी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 109 / तसेच भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब नोकरीतून बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री महोदयांना आदेश देण्यात यावेत ही विनंती.
  2. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनाची नोकरी देण्या करिता मुख्यमंत्री महोदयांना आदेश निर्गमित करण्यात यावे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!