मुंबई-पुणे महामार्गावर दुपारी 12 ते 1 यावेळेत ब्लॉक.

मुंबई – पुणेला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्वाचा आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दररोज अनेक नागरिक प्रवास या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. आज एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज दि.१६ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी १.०० या वेळेत पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.
गॅन्ट्री बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कार साठी खोपोली एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट वरून द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत