देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

नागवंशी प्रबुध्द स्वर्णिम भारत!

लेखक : नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे

YEAR 2021 : POST – 722
WENESDAY : 8 SEPTEMBER 2021

ब्राह्मी लिपी ( BRAHMI SCRIPT ) म्हणजे काय ?

ब्राह्मी लिपी BRAHMI SCRIPT बध्द अभिलेख म्हणजे काय ?

(A) देवनीमोरी – साबरकण्ठा , गुजरात येथे महास्तूपामध्ये उत्खननात पुरातत्वीयांना एक ऐतिहासिक गोलाकार कलश आढळला. ज्यामध्ये सोन्याच्या कुपीमध्ये महामानव गौतम बुद्ध यांच्या शारिरीक अस्थीधातूचे पवित्र अवशेष होते. ब्राॅन्झ धातूयुक्त कलशाच्या गोलाकार झांकणावर आणि पृष्ठभागावर ५ वे शतककालीन ब्राह्मी लिपी ( BRAHMI SCRIPT ) आणि संस्कृत भाषांकित अपूर्व महाअभिलेख अंकित आहे. त्या दुर्मिळ महाअभिलेखाचा मी पुढीलप्रमाणे कलासिध्दीने तंतोतंत हस्तलिखित अविष्कार साकारला आहे. २:५ फूट लांबी व २ फूट रूंदीयुक्त रंगीत मेगापोस्टरवर अचूकपणे (१) ब्राह्मी लिपी BRAHMI SCRIPT बध्द अक्षरे (२) ब्राह्मी लिपिंकित अक्षरांखाली मराठी अक्षरे (३) अभिलेखाचे संस्कृत भाषांकित SANSKRIT LANGUAGE वाचन (४) संपूर्ण अभिलेखाचा मराठी भावार्थ, अशा चार प्रकारे परिपूर्ण स्वर्णिम लेखांकन आहे. जे आधुनिक डिजिटल युगातील अनन्यसाधारण बुध्दधम्मिक दस्तावेज होय.

(B) एकूण ६ ओळीबध्द महाअभिलेखाचे संस्कृत SANSKRUT LANGUAGE वाचन पुढीलप्रमाणे गूढरम्य आहे. पवित्र बुद्धकलशाच्या दर्शनीभागावर प्रारंभिक ४ ओळी आणि झांकणावर उर्वरीत २ ओळींचे अलंकारिक लेखन आढळते. सर्व ऐतिहासिक लेखन हे पेटिकाशिर्ष ब्राह्मी लिपी शैलीबध्द ( BOX HEADED BRAHMI CALLIGRAPHY ) सुलेखन असून अतिशय सुंदरम् अलंकारिक आढळते.

(१) नमस्सर्वज्ञाय || ज्ञानानुकम्पाकारूण्य प्रभावनिधये नम: || सम्यर्क्सबुदध अर्य्याय परवादितमनुदे || सप्तविंशत्यधिके कथिक नृपाणां समागतेब्दशते

(२) भद्रपदपंचमदिने नृपतो || श्रिरुद्रसेनेच कृतमवनिकेतु भुतम्महाविहाराश्रये महास्तुपं सत्वानेकानुग्रह निरताभ्यां शाक्य भिक्षुभ्यां

(३) साध्वग्निवर्म्म नाम्ना सुर्दर्शनेनच विमुक्त रंध्रेण कार्म्मन्तिर्केच पाशान्तिकपट्टी शाक्य भिक्षुकावत्र दशबलशरिरनिलयश्शुभशैलमय स्वयं वराहेण

(४) कुट्टिमकताकतोयं समुद्गकस्सेनपुत्रेण || महसेनभिक्षुरस्यच कारयिता विश्रृत समुद्गस्य

(५) सुगतप्रसाद कात्मतवृदधत्वत्थर्म्म सर्ङ्याभ्यां ||

(C) संस्कृत भाषा SANSKRIT LANGUAGE युक्त महाअभिलेखाचा मराठी भावार्थ याप्रकारे अदभुत अकल्पित अचंबित आहे. ज्यावर वर्तमान भारतखंडातील एकही बुद्धधम्मिक नागरिक विश्र्वास ठेवणार नाही.

अर्हत भगवान बुध्द, जे सर्वज्ञ आहेत, त्यांना त्रिवार वंदन, सम्यक सम्बुध्द , जे ज्ञानाचे, मैत्री व करूणेचे भांडार आहेत, ज्या आर्य पुरुषोत्तमांनी परिदेवरूपी अंध:काराला नष्ट केले आहे, त्या महामानव तथागत बुद्ध, यांना नतमस्तकी प्रमाम. बुध्दउपासक अशा कथिक महाराजांच्या राज्यकाळात १२७ व्या वर्षी , जेव्हा बुद्धनिष्ठ रुद्रसेन नृपती बोधीराज्य करीत होते, तेव्हा भाद्रपद महिन्याच्या ५ व्या दिनी, भूतमहाविहारा निकट अवनीकेतू समान हा भव्यदिव्य महास्तूप साकारला आहे. ह्या महास्तूप निर्मितीचे कुशल पुण्यकर्म, भिक्षू अग्निवर्म आणि भिक्षू सुदर्शन अशा दोन शाक्यवंशी महादानी भिक्षूंनी कर्मक्षेत्रा निकट पाशान्तिकपट्टी येथे उभारून संपन्न केले आहे. पवित्र पाषाणी कलश, ज्यामध्ये महाकारूणी दशबलसंपन्न अशा गौतम बुध्द यांच्या शारिरीक अस्थी आहेत. तो बुद्धकलश , धम्मउपासक सेनपुत्र वराह यांनी स्वत: त्याकरीता निर्माण केलेल्या पवित्र स्थळी स्थापित केला आहे. शाक्यसिंह असे भगवंत बुद्ध यांचा लोकोपयोगी बुद्धधम्म आणि वंदनीय भिक्षूसंघ दोन्हीही वृध्दिंगत होवोत, याप्रित्यर्थ हे कोरीव लेखांकन महालेखाकार महासेन भिक्षू यांनी ह्रदयस्थ अंकित केलेले आहे.

(D) मला सार्थ अभिमान आहे की, मी आज सोशल मिडिया वर हे स्व: लिखित बौद्धधम्मिक ऐतिहासिक अनन्य अनुपम अदभुत पुराभिलेख गर्वाने प्रसिद्ध केले. कारण माझ्या व्यतिरिक्त भारतखंडातील एकाही बौद्ध धम्मिक लेखक अथवा संशोधक यांना हा देवनीमोरी – देवानमौर्य स्थित अभिलेखाचा सखोल संर्दभिक इतिहास पूर्णपणे ज्ञात नाही. यांचे कारण अभिलेखाची ब्राम्हणी संस्कृत भाषा होय. जी विद्यमान भारतखंडातील एकाही बौद्धधम्मिक लेखक व संशोधक यांना परिपूर्णपणे अवगत नाही. मला सार्थ अभिमान आहे की, मी नागवंशी महारठी कूलीन आणि कट्टर बौद्धधम्मिक मराठी लेखक असून देखील, मला ब्राम्हणी संस्कृत भाषा SANSKRUT LANGUAGE देखिल ऊत्कृष्ट प्रकारे लिहिता व वाचता आणि बोलता देखिल येते.

आहे की नाही ? डिजिटल इंडियामधील आधुनिक नागवंशिक बौद्धमहिमा ????

(E) ब्राह्मी लिपी ( BRAHMI SCRIPT ) म्हणजे काय ?

ब्राह्मी लिपीबध्द अभिलेख म्हणजे काय ??????

क्रमश:

नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे

(1) संस्थापक : नागवंशी बुध्दिस्ट किंगडम अभियान

(2) बौध्दाचार्य : भारतीय बौद्ध महासभा

(3) विपस्सनाचारी निःशुल्क विपस्सना सेवा उपलब्ध आहे.

(4) BUDDHIST BRAHMI CALLIGRAPHER

(5) ENTREPRENUR :
NAGLOK MARKETING INDIA

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सूचना : प्रस्तुत ऐतिहासिक बौद्ध धम्मिक संदर्भी महालेखाचे सर्वाधिकार COPYRIGHT हे लेखक नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे यांच्या कडे पूर्णतया सुरक्षित आहेत.

कृपया कोणीही यामध्ये फेरफार करू नये अथवा स्वत:च्या नावावर प्रसिद्ध करू नये अथवा कोणत्याही प्रकारे दुरूपयोग करू नये.

🙏🙏🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!