एसटीच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दैनंदिन उत्पन्नात सुमारे दीडपट वाढ.
सणासुदीच्या काळात एसटीच्या प्रवासाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून एसटी महामंडळाने जिल्ह्यात ११ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ६ कोटी ८ लाख ९१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे.
अमरावती जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार असे एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारातजून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. यातून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. शहराचे वाढते नागरीकरण यासोबतच आता एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे, एसटी महामंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकिटांमध्ये सवलत लागू केल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. विशेषत: दिवाळीच्या सुट्टया आणि सणासुदीच्या काळात गावी जाण्यासाठी व इतर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी एसटीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत