भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल विशाखापट्टणम इथं खेळण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या. हे लक्ष्य भारतानं आठ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सूर्यकुमार यादवनं 80 आणि इशान किशन 58 धावांची झंझावाती खेळी केली. दोन्ही संघांनी विश्वचषक सामना खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली होती. मालिकेतील पुढचा सामना येत्या रविवारी तिरुवनंतपुरम इथं खेळला जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत