अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी; ठाणे जिल्हा शाखेचं गठन.


मुंबई : रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, नालंदा बुद्ध विहार, कळवा येथे अ.सा.क.प्र.चे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रा. विजय मोहिते यांच्या उपस्थितीत आणि ॲड. धम्मकिरण चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठाणे जिल्ह्यातील साहित्यिक विचारवंतांच्या बैठकीत अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या ठाणे जिल्हा शाखेचं गठन करण्यात आले.
या वेळी अ.सा.क. प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीत उपस्थितांना संस्थेची ध्येय उद्दिष्टे आणि नियम यांची ओळख करून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व मिळेल याची दक्षता घेऊन ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
अध्यक्ष: प्रा. विजय मोहिते
कार्याध्यक्ष: ॲड. धम्मकिरण चन्ने
सरचिटणीस: आयु. संघरत्न गणपत घनघाव
आयु. संतोष गोविंद खांबे
कोषाध्यक्ष: आयु. अजितकुमार जीवा चन्ने
उपाध्यक्ष: प्रा.जगदीश अमृता घनघाव ( शहापूर)
आयु.मिलिंद सुरेश जाधव (भिवंडी)
आयु. जयवंत सोनवणे (कल्याण)
आयु. रवींद्र थोरात (अंबरनाथ)
चिटणीस: प्रा. संदीप शांताराम पवार,
आयु. नरेश जाधव, आयु. क्रांतिलाल
भीमराव भडांगे,
कार्यकारिणी सदस्य: आयु. आनंद शंकर वाघचौडे,
आयु. रवींद्र गणपत संगारे, आयु. संतोष रामचंद्र जाधव, आयु. विशाल अनंता घनघाव, आयु. बी. डी. गायकवाड
सल्लागार: प्रा. शुक्राचार्य गायकवाड.
या बैठकीत ज्या तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्या तालुक्यांनाही या कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील शिवाय कार्यकारिणीत महिलांचा सहभाग असावा असाही प्रयत्न राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत