वैवाहिक जीवनात होणारा त्रास निमूटपणे सहन न करता चर्चा करून मार्ग काढावा – किरण राव.
मुंबई- संविधानाने महिलांना अनेक विशेषाधिकार दिलेले आहेत आणि कोणताही त्रास किंवा घुसमट गुपचूप सहन करण्याची गरज नाही याचा प्रत्यय बॉलिवूड मधील चर्चेत असणारे आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे पाहून येतो. या दोघांचे १५ वर्ष जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आले. दोघांनी घटस्फोट केला. खरेतर ही बातमी समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला होता. पण विभक्त होऊनही त्यांच्या नात्यात आदर कायम आहे. दोघेही मुलाला म्हणजेच आझादला एकत्र वाढवतात, आणि कुटुंबातील सण-उत्सवात एकत्र साजरा करतात.
किरणने नुकताच ‘लपता लेडीज’ चित्रपट दिग्दर्शित केला. यामुळे ती सतत चर्चेत होती. आता तिने महिलांना संसारात त्रास झाला तर तो सहन न करता गप्प न बसण्याचा सल्ला दिला आहे. आमिरपासून ती का वेगळी झाली हेही सांगितले!
किरण रावने हे देखील सांगितले की लग्नाचा एखाद्या व्यक्तीवर कसा नकारात्मक प्रभाव पडतो, जिथे ती व्यक्ती अडकल्यासारखे वाटू शकते. ती म्हणाली, ‘मला वाटते की लग्नामुळे तुमच्यावर, विशेषत: महिलांवर कसा अत्याचार होतो याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही. मग स्वत:ला सुधारण्याचा मार्ग कसा शोधायचा हे तुम्हाला कसे कळेल? यावर वाद व चर्चा व्हायला हवी असे मला वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत