शिंदेंचा खासदार, कमळावर होणार स्वार ? गावितांची हॅट्रिक साठी तयारी
पालघर : मित्र पक्ष आणि युती म्हणत भाजपा चे दबाव तंत्र हळू हळू शिवसेना शिंदे गटाला पोखरत आहे का असा प्रश्न पडला आहे. श्रीकांत शिंदे कोणत्या चिन्हावर लढणार हे स्पष्ट नसताना आता शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित हे ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तसं झाल्यास, भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणारे ते पहिले शिवसेना खासदार ठरतील. गावित हे दोन टर्म
2019 च्या जागावाटपात निर्माण झालेल्या संधि चा फायदा घेत गावित भाजपा मधून शिवसेनेत आले,! नंतर शिंदे गटात सामील झाले आणि आता 400 च्या लक्षपूर्ती साठी ते पुन्हा भाजपा च्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा खात्रीशीर अंदाज बांधण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत