
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाला पंतप्रधान मोदी कारणीभूत असल्याचं सांगताना त्यांचा पनौती असा उल्लेख केला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या विधानावर भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. पण राहुल गांधींबाबत बोलायचं झाल्यास त्यांचा पक्षच त्यांना गांभीर्यानं घेत नाही, लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. तर मग मी त्यांना का गांभीर्यानं घ्यावं? अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या विधानावर भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. पण राहुल गांधींबाबत बोलायचं झाल्यास त्यांचा पक्षच त्यांना गांभीर्यानं घेत नाही, लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. तर मग मी त्यांना का गांभीर्यानं घ्यावं? अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत