आमदार बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणतात, “आजकाल आपण ज्या लोकांना मानतो त्यांच्यातही वाद आहेत. नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर दिसतो.”
राजकीय वातावरण तापलेलं असताना आमदार बच्चू कडूंच्या विधानाची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
आमदार बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “सरकार व जरांगे पाटील यांच्यातला समन्वय अधिक चांगला राहण्याची गरज आहे. जरांगे पाटलांचा फोन आल्यानंतर मी मध्यस्थाची जबाबदारी स्वीकारली होती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. इथे सगळे एकोप्यानं राहिले आहेत. धर्म वा जातीच्या नावानं महाराष्ट्रात कुठेही अशांतता माजू नये. त्यामुळे भुजबळ व जरांगेंनी मुद्द्यांवर भांडावं पण व्यक्तिगत टीका-टिप्पणी होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत