थेट शिक्षणाधिकारी कार्यालयात वेतनासाठी शिक्षकांचे आंदोलन

आंदोलनादरम्यान बाळ रडत असल्यामुळे आंदोलनातील एका शिक्षिकेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच झोका बाधून बाळाला झोपवले. गेल्या 10 वर्षापासून वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून सोनपेठ शहरातील मुक्तेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी कुटूंबासह बुधवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सोनपेठ (जि.परभणी) येथील मुक्तेश्वर विद्यालयातील शिक्षक के.टी.तोडकरी, ए.के.लोणे, जे.व्ही.कुलकर्णी, के.पी.जोगदंड, आर.आर.चौरे व पी.आर. बुच्छलवार या सहा शिक्षकांचा गेल्या 10 वर्षापासून पगार बंद आहे. संस्थाचालक बबन कुरे आणि संबंधित मुख्याध्यापक या शिक्षकांवर दबाव आणत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. पगार नसल्याने कुटंबाची उपासमार होत असल्याचेही य़ा शिक्षकांचे म्हणणे आहे. या संदर्भात या शिक्षकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयाने शिक्षकांचे नियमानुसार वेतन द्यावे असा निर्णय दिलेला असतांनाही जिल्हा परिषद शिक्षक विभाग व संबंधीत संस्थाचालक या निर्णयाला मानत नसल्याने या शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागत असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत