गोव्यामध्ये सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय इफ्फी महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सनीविषयी जे मनभरून कौतूक केले आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी गदर चे दिग्दर्शक अनिल शर्मा, राहुल खैल हे देखील उपस्थित होते. संतोषी यांनी सनीचं कौतुक केलं आणि सनी भावूक झाल्याचे दिसून आले. राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, सनी हा खूप प्रतिभावान अभिनेता आहे. मात्र बॉलीवूडमधून त्याच्या अभिनयाला आणि त्याच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही. भलेही इंडस्ट्रीनं त्याच्यातील टॅलेंटची कदर केली नसेल पण देवानं त्याच्यातील गुणवत्ता हेरुन त्याला घडवले. एका मोठ्या दिग्दर्शकाच्या तोंडून आपलं कौतुक ऐकुन सनीलाही राहवलं नाही. आणि त्यानं देखील यावेळी प्रतिक्रिया देत उपस्थितांना जिंकून घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत