आईच्या काळजीपोटी येरवडा कारागृहातून पळून गेलेला कैदी स्वत:हून हजर
येरवड्यातील खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेलेला कैदी बुधवारी (ता. २२) स्वत:हून कारागृहात हजर झाला. येरवडा येथील खुल्या जिल्हा कारागृहातून आशिष जाधव या कैद्याने पलायन केले होते. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी कैद्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, त्याची आई हृदयविकाराने आजारी होती. त्यामुळे त्याने कारागृहातून पलायन केले असावे, अशी माहिती मिळाली. दरम्यान, कैदी आशिष जाधवचे आई-वडील त्याला कारागृहात हजर करण्यासाठी आज घेऊन आले. कारागृह प्रशासनाने ही बाब येरवडा पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी कैद्याला ताब्यात घेतले. आईच्या काळजीपोटी त्याने पलायन केल्याची शक्यता आहे. आईची तब्येत ठीक असल्यामुळे तो स्वत:हून हजर झाला, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत