
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले 2019 पासून जग सतत संकटाचा सामना करत आहे.त्यामुळे किरकोळ महागाई कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. महागाई कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. चलनविषयक धोरणात महागाई नियंत्रणाला प्राधान्य दिले जात आहे. खाद्यपदार्थांची महागाई हा अजूनही चिंतेचा विषय आहे.
दास पुढे म्हणाले की, सध्या भारतीय रुपयामध्ये कमी चढउतार होत आहेत, म्हणजेच तो स्थिर आहे. अमेरिकन बँकेने दर बदललेले नाहीत. बँकिंग व्यवस्थेशी संबंधित जोखमींवर RBI बारीक नजर ठेवत आहे. कृषी क्षेत्रात सुधारणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मान्सून कमी असूनही कृषी क्षेत्रात स्थिरता आहे. कर्जाची मुदत काही कर्जदारांनी वाढवली आहे. बँका आणि एनबीएफसींनी जास्त कर्जे वितरित करू नयेत. NBFC ने बँक कर्जावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. सर्व पातळ्यांवर पत वाढ राखणे महत्त्वाचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत