
डंकी येणार हे कळताच त्याच्या कथेविषयी चर्चा सुरु झाली. या चित्रपटामध्ये जो विषय हाताळण्यात आला आहे तो वास्तविक घटनेवर असल्याचे बोलले जात आहे. परदेशामध्ये अवैध मार्गानं होणारी इंट्री, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, त्यांचा संघर्ष हे सारं चक्रावून टाकणारं आहे. भारतातील एका राज्यातून अशा मार्गानं परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
त्यातील कथा ही भारतातल्या काही राज्यांतील वास्तविकता आहे. असं बोललं जातं. हरियाणामधील ते वास्तव डंकीच्या निमित्तानं समोर आले आहे. त्या गावातील काही जणांनी हे प्रकरण काय आहे उदाहरण आणि काही प्रसंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. हरियाणा राज्यातील त्या जिंद नावाच्या जिल्ह्यामधील गावांतील तरुणांना अमेरिकेत जायचं आहे. तिथं जाऊन पैसे कमवायचे आहेत. अमेरिकेत गेल्यावर त्यांना मिळतो डंकीचा मार्ग. त्यात अवैधरित्या दुसऱ्या देशात जातात. जिंदमधील लोकं हजारो रुपये खर्च करतात. प्रत्येक देशात अवैध मार्गानं जाण्याची वेगळी किंमत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत