
ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महिला क्रिकेटमध्ये आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी सकाळी ९.३० वाजता चालू झाला. भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व एलिसा हिली करत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हां ऑस्ट्रेलियाच्या ४६ षटकांत ५ बाद १५३ धावा झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या महिला संघाचा विक्रमी ३४७ धावांनी पराभव केला होता. फिरकीपटू दीप्ती शर्मानं या सामन्यात ९ गडी बाद करत विक्रमी कामगिरी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत