वसंत कासारे.
नदीच्या मूळ प्रवाहाला अडथळा निर्माण झाला की त्या आडथळ्यामुळ एक वेगळा प्रवाह चालू होतो. या वेगळ्या प्रवाहाची दिशा बदलते. दशा बदलते.
सेम विचार प्रवाहाचही आहे. तथागत गौतम बुध्दांच्या विचारप्रवाहाला असेच अनेक अडथळे आडवे आले आणि अनेक प्रवाह निर्माण झाले. होत आहेत. हल्ली हल्ली एक नवा प्रवाह आडवा आलेला आहे. तो म्हणजे आज काही लोक ठासून सांगू लागलेत की हिंदूंचे सर्व सण आणि उत्सव आहेत ते सगळे मूळ बौध्दांचे सण आहेत. आणि भेसळीच्या औलादींना तेच पाहिजे. ते मग मोठ्या जोमाने हिंदू सण साजरे करू लागलेत. शुभेच्छांचा पाऊस पाडू लागलेत. या सण उत्सवांच्या प्रचार प्रसारात विपश्यना समर्थकांचा मोठा हात आहे. विपश्यना समर्थक + भेसळीच्या औलादी असा तो प्रवाह वाहतो आहे.
माझा प्रश्न आहे तमाम बौध्द बांधवांना. गळ्यात मडक, कंबरेला झाडू असताना, हागणदरीत रहात असताना, शिळे उष्टे तुकडेही मिळायची शाश्वती नसताना, आब्रू झाकण्या पूरतही लुगड, लंगोट मिळण मुश्कील असताना कोणते उत्सव साजरे करीत होतात ? किती दिवे लावत होतात ? कोणत्या झोपडीत दिवा लाऊन गुढ्या तोरण लाऊन पंचकक्वान्न दरवळत होती ? आठवा ते दिवस. आठवा ती परिस्थिती. कुत्री मांजर लाख पटीन सुखी होती. माणसा सारखी माणस मात्र विष्ठेतल्या किड्यांसारखी वळवळत , तडफडत मरत होती. आणि आज मोठ्या दिमाखान सांगत आहेत या भेसळीच्या औलादी की सगळे सण उत्सव बौध्दांचेच आहेत. अरे , पण मग सण उत्सवच का ? का बुध्द यांच्या घरात नाही. का बुध्दांच तत्वज्ञान या लोकांच्या आचरणात नाही. हिंदूंनी बुध्द आणि बुध्द तत्वज्ञान न चोरता फक्त सण उत्सवच चोरले का ? मला प्रश्न पडलेत असे अनेक. हे प्रश्न भेसळीच्या बेईमान निलाज-या औलादींना नाही पडणार. कारण आज त्यांची औकात बदलली. त्यांना माज आलाय आजच्या श्रीमंतीन. अरे पण ही औकात कुणामुळ ?
ही औकात, ही श्रीमंती फक्त आणि फक्त डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांमुळ. आणि त्या नंतर बुध्द धम्मामुळ.
तुम्ही पुन्हा विपश्यनेत आणि सणउत्सवाच्या कर्मकांडात समाजाला ढकलाल अस बाबासाहेबांना वाटलच होत. म्हणून महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्म स्विकारताना बावीस प्रतिज्ञा दिल्या. मात्र आमच्या भेसळीच्या औलादींना त्या कालबाह्य झाल्या सारख्या वाटत आहेत.
हातात हिंदू धर्माचे गंडे दोरे बांधून, कप्पाळाला बैठकीचे लाल भगवे काळे टिळे लाऊन हिंदू सणांच्या शुभेच्छा देतातच. शिवाय सगळे हिंदू सण बौध्दांचेच आहेत हे ठासून सांगत आहेत.
अरे बेईमान मजलेल्या औलादींनो इतकच प्रेम आहे या सणउत्सव, कर्मकांडाच तर जा ना तिकड खुश्शाल. नका ना नासऊ बुध्दांचा निर्मळ प्रवाह.
तथागत बुध्दांनी कुठलाच उत्सव साजरा केलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलय माझा जयजयकार करण्या पेक्षा मी सांगितलेल कार्य पुढ न्या. धम्माचा प्रचार प्रसार करा. भारत बौध्दमय करा. चक्रवर्ती सम्राट अशोकान बांधलेले स्तूप आणि शिलालेख ही बौध्द विरासत आहे तीचे जतन करून तिथ जाण्या येण्यासाठी चांगले रस्ते बनवा. तिथ विजेचे दिवे पोहोचवा. तेलाचे दिवे काय कामाचे ?
अरे आजही रोजच्या जेवणात वापरायला पळीभर तेल नसलेली अणगित कुटुंब आहेत. आजही रोज सकाळी उठून जायच चार पैसे कमवायचे आणि संध्याकाळी पीठ मीठ मीरची विकत आणून अर्धवट पोट भरणारे अगणित प्रपंच आहेत. त्यांना कसली दिवाळी, कसला दिपदानोत्सव.
आपल्या बौध्दांना या असल्या छीनाल चाळ्यांचा मोह होतोय तो त्यांचा माज आहे.
आमची आज जी प्रगती झाली आहे त्यात पन्नास टक्के वाटा आहे सांविधानान दिलेल्या हक्कांचा. आणि पन्नास टक्के आहे बौध्द धम्माचा. बौध्द धम्मामुळ आम्ही हिंदू कर्मकांडातून म्हणजेच शोषणातून बाहेर पडलो. हे सण उत्सव आनंद नाही, प्रगती नाही तर ते आहे शोषण. ते आहे व्यापारी आणि पुरोहितांच पोषण.
बुध्दांच्या धम्माच्या निर्मितीचा मूळ उद्देश गुलामी आणि शोषण मूक्ती हाच आहे. हेच कळत नाही श्रीमंतीच्या ओझ्यान बुड सुजलेल्यांना.
कसले सण ? कसले उत्सव ? कसले दिवे लावताय रे ? अरे जे तेल खाताय ते तरी शुध्द आहे का ? ऐंशी टक्के भेसळ आहे रे त्यात. कशाला टिमक्या मिरवताय. ती ही शुध्द तेल खाण्याची ऐपत आपल्या देशाची नसताना ? अरे लाजा वाटल्या पाहिजे की आजही आम्ही गरीब आहोत. शोषणाचे बळी आहोत. गुलाम आहोत.
करा एखाद्या हिंदू मध्यम वर्गीय कुटुंबाच्या वर्षभराच्या सण उत्सवांचा हिशोब. कळेल किती शोषण होत आहे.
बांधवांनो, आम्ही बौध्द लोक तेल दिवा जाळत नाही. आम्ही मेणबत्ती लावतो. का ?
याचा विचार केलात ?
अरे मेण माणूस खात नाही. माणूस तेल खातो. ते जाळून फुकट जाऊ नये हा एक उद्देश. दुसर तेलातून काळा कार्बन निघतो. मेणबत्तीतून नगण्य निघतो. मेणा पेक्षा तेल महाग असतो. तेलाचा दिवा चार चार तास जळतो. हवेतील आॕक्सिजन तेवढच जळत. आधीच झाड कमी झालीत, प्रदुषण वाढलय. त्यात तेला मुळ कार्बनडाय आॕक्साईड हवेत पसरतो. आॕक्सिजन जळून कमी होतो. मेणबत्ती अर्ध्या तासात संपते. तेही आमचे किती बौध्द रोज जाळत असतील हा संशोधनाचाच विषय आहे.😁 त्यामुळ जे काही प्रदुषण होतय ते तेल दिवे जाळणा-यांमुळ.
आम्हाला कर्मकांड, शोषणात खितपत सडवायच नव्हत म्हणून आणि म्हणूनच बा भीमान आम्हाला बुध्द धम्म दिला. बावीस प्रतिज्ञेत आम्ही कबूल केलय की आमचा नवा जन्म झाला. नवा जन्म झाला याचा अर्थ आम्ही जुन्या सगळ्याला लाथ मारली. पण लाथ मारताना दुसरा पाय मात्र आम्ही घाणीन बरबटलेला तसाच घेऊन आलोय बौध्द धम्मात अस वाटतय. तो पुन्हा बावीस प्रतिज्ञांनी स्वच्छ करावा लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शुध्द साधा सरळ बुध्द आचरणात आणावा लागेल. बुध्द जयंती. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती. बारा पौर्णिमा. धाम्म चक्क प्रवर्तन दिन. हेच आमच्या आनंदाचे, उत्सवाचे दिनविशेष असले पाहिजे. त्यात ही उथळ भोंगळवाद न दिसता साधासरळ सोज्वळपणा आणि धम्माचा प्रचार प्रसार होईल असा बुध्दीवाद असायला हवा.
बाबासाहेबांच एक ऐतिहासिक वाक्य आहे. बहुजन जे उत्सव, सण साजरे करतात ते त्यांच्या आनंदाचे दिवस नसून पराभवाचे दिवस आहेत. दिवाळीचच उदाहरण द्यायच झाल तर एक म्हण आहे. इडा पीडा जावो आणि बळीच राज्य येवो.
बळी हा कुणबी , शेतकरी बहुजन राजा. सज्जन , सदाचारी, दानशूर. अशा बळी राजाला वामन नावाच्या ब्राम्हणान कपटान ठार मारल आणि त्याच राज्य बळकावल.
जर बळी राजा वाईट असता तर आजही बहुजन बोलले नसते, इडा पीडा जावो आणि बळीच राज्य येवो ! बळीचा खून हा दिवाळी उत्सव कसा असू शकतो ?
यावरून हेच सिध्द होतय की हे हिंदू सण उत्सव बहुजनांच्या पराभवाचे उत्सव आहे.
बहुजन बांधव गुलाम आहे. पण आम्हाला आमच्या बापान बुध्दीला, तर्काला, आणि विज्ञानाला मान्य करणारा गुलाममूक्त धम्म दिला. मग का आपण पुन्हा पुन्हा प्रबोधनकार ठाकरे महोदयांनी शौचकुपाची उपमा दिलेल्या घाणीत जिभल्या बुडवतोय !
तेही आपल्या महान बापान हे सण उत्सव आपले नाहीत हे सांगितलेल असताना !
बुध्द व्हा.
शुध्द व्हा.
विवेकवादी व्हा.
तर्कवादी व्हा.
शोषण मूक्त व्हा.
स्वतंत्र व्हा.
सत्य स्विकारा.
परत उकीरड हुंगु नका.
🙏
वसंत कासारे.
(8087480221)
आज चहू बाजूला तेल दिव्यांचा झगमगाट दिसतोय. ईलेक्रीक दिव्यांचा झगमगाट असताना. जिकडे तिकडे फटाक्या जाळून अब्जो रुपये जाळले जाताहेत. फटाक्यांच्या धूरान अफाट प्रदुषण होत आहे. अपघात होत आहेत.
आम्ही बौध्दांनी या सण उत्सवांच्या अविवेकी, अवैज्ञानिक, दिवाळखोर, कर्मकांडयुक्त अकुशल कर्मातून स्वतःला अलिप्त ठेवण्याच कुशल कर्म केल पाहिजे. तरच माझा नवा जन्म होत आहे . या प्रतिज्ञेला आपण पात्र ठरू.
अन्यथा महारांनी धम्म बाटवला हा कलंक सिध्द करू.
🙏
जयभीम.
नमो बुध्दाय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत