संजय राऊत यांची राहुल नार्वेकरांवर टीका.

सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होणार असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे. “हे चोर आणि लफंग्यांचं सरकार चालवत आहेत. आणि त्या चोर आणि लंफग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर विधिमंडळाचे अधिकार, विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाविषयी सांगत आहेत. याचा अर्थ असा नाही की चोरी करून एका घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुन्यांना संरक्षण द्यावं, अशी या सार्वभौमात्वाची व्याख्या होत नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
“मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचे तेवढेच आमदार अजित पवारांसह बेकायदेशीरपणे मूळ घरांची लूट आणि चोऱ्या करून दुसऱ्या घरात शिरले आहेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाचं नाव देऊन संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून देशाच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. भगतसिंह कोश्यारीनंतर राहुल नार्वेकरांचं नाव घेतलं जाईल. ते जेव्हा खुर्चीवर नसतील तेव्हा अशा लोकांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. या राज्याची जनता माफ करणार नाही”, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी यावेळी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत