आंबेडकराईट उद्योजकांचीनवी झेप : एका छताखाली सारं

🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक आहेत
‘प्रवर्तन’च्या तरुण मित्रांनी पुन्हा एक पाऊल पूढे टाकले. त्यांना सर्व अंगांनी विकास साधायचाय. समाजात सुबत्ता आणायचीय. ते झटत आहेत. ते खपत आहेत. आता ७, ८, ९ मार्चला ते अ ब क घेऊन येताहेत. ‘आंबेडकराईट बिझनेस कार्निवल’ (ABC).
नव्या आव्हानांचा शोध घेत नवीन जीवनवाटा शोधण्यात ते गर्क आहेत.सदर कार्निवल हे बानाई परिसर, उरुवेला काॅलनी, वर्धा रोड, नागपूर येथे होणार आहे. यात दैनंदिन उपयोगाच्या सर्व वस्तू माफक किंमतीत उपलब्ध असतील. शिवाय ज्ञानार्जनाचे वेगवेगळे उपक्रम इथे आहेत. सोबत स्वादिष्ट ‘फुड झोन’ इथे असणार आहे. महिला गृहोद्योगाला विशेष प्राधान्य देण्यात आलेय.
प्रवर्तन इव्हेंटस हे बौध्दांतील धडपड्या तरूण उद्योजकांचे स्वप्न आहे. ते संघटनस्वरुपात आहे. दरेक वर्षाला ते असे कार्यक्रम आयोजित करतात. दरवर्षी प्रतिसाद वाढतो आहे. आतापर्यंत बेझणबाग मैदानावर या टीमने तीन यशस्वी मेळावे घेतलेय. एक खाद्य संस्कृतीचा ‘मांडे उत्सव’ नरेंद्र नगर येथे घेतला.
आता बानाई परिसरात हे कार्निवल होत आहे.या तरुणांचे प्रयत्न उद्दिष्टांसाठी आहेत. त्यांना स्वयंपूर्ण व्हायचय. स्वयंपूर्ण करायचय. त्यांचे मते .., पूढची आव्हाने तीच ठरणार आहेत. जसे बौध्दजन धम्मात एकसंघ झाले तसे धनातही व्हावे. तसा कयास प्रयास आहे. ते विचारतात.., तुमच्या मिळकतीचा पैसा कुठे जातो ? कुठे थांबतो ? काही विशिष्टांनी व्यापार-उदिम करावा म्हणजे काय ? जसे शिक्षण घेणे कुणाची मक्तेदारी नाही तसे हेही. इथे ग्राहक उपभोक्ता लागतो. तो होता येत असेल तर पहा. ते जातीय वा धर्मिय भावनेतून नाही. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ .. या अर्थाने.
पैसा वाहता असतो. कुठे थांबावा. कुठे थांबवावा याचा विचार करणे .. हे असते.
या प्रवर्तनमध्ये मनोप्रवर्तनासाठी ..,
विक्रम बोरकर, हितेश पिल्लेवार, नयन लोखंडे, शुभम मांडवकर, हिमांशू खानखने, प्रवीण कडबे, अमोल नगराळे, रजनीश थुल, वैशाली गोस्वामी, निखिल रामटेके, राहुल डोंगरे, साकेत डोंगरे, रोहन राऊत अहोरात्र खपत आहेत. विशेष म्हणजे यासर्वांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. सामाजिक जबाबदारीच्या प्रेरणेतून ही तरूण मने याकामी समर्पित आहेत.
तरुणांच्या या संघटित प्रयत्नाला विशेषतः अरविंद गेडाम, जयंत इंगळे, निलेश नाखले, अखिलेश ढोणे, सागर मेश्राम, अभिषेक गेडाम, धम्मा मनवर, राहुल हनवते, रजत द्रोणकर, विकी गायकवाड, आशिष सनकाळे, रजत रोडकर, रोशन जांभुळकर, निलेश बागडे, शैलेश खोब्रागडे, अजय सोनुले, प्रणाली मांडवकर, लेखा बोरकर, रोहिणी दहिवले, पूजा नाखले, पल्लवी वानखेडे, आरती हनवते, सुवर्णा डोंगरे हे सुज्ञजन सहाय्य करीत असतात.
या प्रकल्पासाठी द बुध्दिस्ट नेटवर्क, अबोली मैत्रेय संघ, बीईसी, जयभीम मित्रमंडळ व महात्मा फुले व्यवसाय मार्गदर्शन केंद्र हे सहकारात आहेत.
अर्थात, ७-८-९ मार्च फार दूर नाही. बानाई परिसर लक्षात ठेवावे. उद्यमीरोपांना वेळीच खतपाणी मिळाले की फळाफुलांचे होतील. सावलीचे होतील. दूरचे पहावे.
खिसा कुठे रिकामा करावा हेही शोधता यावं. या. एकटे या. एकत्र या. सहकुटुंब या. पण या जरूर.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत