रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी सर्व आरोपींना क्लीन चिट; रोहित दलीत नव्हता हा नवीन संतापजनक जावईशोध

तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टमध्ये दावा केला होता की वेमुला हा दलित नव्हता आणि 2016 मध्ये त्याने आत्महत्या केली कारण त्याला त्याची “खरी जात” उघड होईल अशी भीती होती. क्लोजर रिपोर्टमध्ये पुराव्याअभावी पोलिसांनी आरोपींना क्लीन चिटही दिली.

तेलंगणा : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या लज्जास्पद गोष्टीमुळे भारतातील जातीय द्वेष उघड झाला, उच्च पदावर बसलेले जातीवादी लोक दलीत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर करण्यासाठी कसा जीवघेणा खेळ खेळतात ते दिसून आले त्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न तेलंगणा पोलिसां कडून होताना दिसत आहे. एका दलित विद्वान उच्च शिक्षित मुलाने जातीय अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना 17 जानेवारी 2016 रोजी घडली, जेव्हा रोहितने गळफास घेतला, रोहितने आत्महत्या केली तेव्हा तो हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात समाजशास्त्र विभागातून पीएचडी करत होता.
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी २ मे रोजी उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वेमुला अनेक गोष्टींमुळे तणावात असल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. राहित वेमुला हा दलित नव्हता, असे पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुलाच्या मृत्यूच्या 100 महिन्यांनंतर हा अहवाल दाखल केला आहे.
या अहवालानंतर, रोहितची आई आणि भाऊ संतापले आणि त्यांनी शुक्रवारी, 3 मे रोजी सांगितले की ते 2016 च्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणातील तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला कायदेशीर आव्हान देतील. कुटुंबाच्या अनुसूचित जाती (एससी) स्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला, त्यानंतर पोलिसांना ते अधिक तपास करतील, असे त्यांचे भाऊ राजा वेमुला यांनी सांगितले.
पीटीआय या वृत्तसंस्थेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रोहितचा भाऊ राजा वेमुला यानेही सांगितले की, ते याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची भेट घेण्याचा विचार करत आहेत.
वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरून काँग्रेसचा धिक्कार केला आहे. एककीडे रोहित वेमुला दलित नाहीच असं म्हणाय़चं, आणि दुसरीकडे न्यायाच्या गोष्टी करायच्या, हा काँग्रेसचा सर्वात मोठा ढोंदीपणा आहे, न्यायाचा अर्थ कळत नसेल तर न्याय शब्द उच्चारू नका, अशा शब्दांत आंबेडकरांनी काँग्रेसची खरडपट्टी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत