बार्टीच्या जाचाला कंटाळुन विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा इशारा ?


नंदुरबार या दुर्गम भागातील राहुल इंदिसे हा विद्यार्थी आहे.त्यांनी राज्यसेवा प्रशिक्षण 2023_24 साठी विशेष बाब म्हणुन प्रवेश व्हावा यासाठी बार्टीकडे अर्ज केला होता.तुमचा प्रवेश झाला आहे असे बार्टीकडुन त्याला सांगण्यात आले होते.अचानक कोणतेही लेखी कारण न देता
रद्ध केले.
मूळातच विशेष बाब हे प्रकरण फक्त बार्टीत ठेवले जात आहे.यासाठी विद्यार्थी वणवण करुन स्थानिक नेत्याची पत्रे घेत आहेत.बार्टीवाले मात्र ताटकळत ठेवत आहेत.
याबाबत तो सातत्यांनी मुख्यमंत्री कार्यालय,महासंचालक व संबंधीत अधिकार्याची भेटीगाठी करत होता.त्याला आजपर्यत कोणीही दाद दिली नाही.प्रचंड तो हतबल झालाय.नैराश्यात गेलाय.
राज्याच्या ऐका टोकावरुन म्हणजे नंदुरबार वरुन येणे जाणे त्याला परवडत नाही.
हद्द अशी झाली की, तूम्ही त्रास दिला तर तूमच्यावर गुन्हे दाखल करु (याचा विडोओ माझ्याकडे आहे)अशी धमकीच बार्टीतील कर्मचारी शुभांगी सुतार यांनी त्या विद्यार्थ्यांना दिली आहे.
या संदर्भात पारदर्शकता यावी.सत्यता काय ती समोर यावे.परंतु या गोष्टीतून बार्टीच्या अधिकारी व कर्मचार्याची दडलशाही व मग्रुरपणा वरचीवर कीती वाढत जात आहे हे दिसतंय.या सर्वां प्रकरणाला अप्रत्यक्ष महासंचालक सुनील वारे पाठिंबा देत असतील तर अधिक खेदाची बाब आहे.
या सर्व मानसिक त्रासाला कंटाळुन हा होतकरु युवक आता आत्महत्याचा इशारा देत आहे.याबाबत महासंचालकास
ना खंत ना खेद..!
अँड.कुलदीप आंबेकर
अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत