
झारखंडमधल्या खुंटी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. येत्या २५ वर्षात देशाला विकसित करायचं असेल तर महिला, शेतकरी, युवक, मध्यमवर्ग आणि गरीबांना आणखी बळकट करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. झारखंडमधल्या खुंटी जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २४ हजार कोटींच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचं लोकार्पण त्यांनी काल केलं.देशभरातल्या २२ हजार गावातल्या ७५ आदिवासी समुदायाला त्याचा लाभ मिळणार आहे.प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या 18 हजार कोटी रुपयांच्या १५ व्या हप्त्याचं वितरण काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.आदिवासींच्या कल्याणासाठीच्या योजनांवरचं निधी सरकारनं ६ पट केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.देशभरातल्या ६८ आदिवासी बहुल जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ या माध्यमातून देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.यावेळी प्रधानमंत्र्यांनी विकसित भारत संकल्प शपथही दिली.आता देशातल्या १०० टक्के बालकांचं लसीकरण होत आहे.जल जीवन मोहिमेमुळं ७० टक्के घरांमध्ये पाणी पोहोचल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. महिला आणि बालिकांच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. येत्या काही काळात देशातल्या २ कोटी महिला लखपती दीदी योजनेअंतर्गत लखपती होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत