वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाचे दिशा निर्देश जारी.

महाराष्ट्रातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. या प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाने आज नागरी संस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिवाळी दरम्यान संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडले जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्याधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वायू प्रदूषणावर स्थानिक प्रशासनाला दिशा निर्देश जरी केले आहेत. बांधकामातून बाहेर पडणारे काँक्रीट आणि इतर साहित्य दिवाळीपर्यंत हलवू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत