शाळा प्रवेश दिन आणि आपण 7 नोव्हेंबर.

15 आँगस्ट आणि 26 जानेवारी . स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस कसा साजरा केला जातो तसेच घरातल्या लहान मोठ्यापासुन त्या दिवशी चांगली कपडे घालुन गावातल्या किंवा आपल्या जवळच्या शाळेत आपल्या लहान मुलांना घेऊन आई वडील किंवा घरातील इतर ही मंडळी शाळेत येत
मग 7 नोव्हेंबर अर्थात बाबासाहेबाचा शाळा प्रवेश दिन आपण ही मोठ्या उत्साहाने आंनदात वैचारिक माहिती तसेच बाबासाहेबांच्या जीवनाचा सषंर्घ अगदी जन्मापासुन तर किमान महापरिनिर्वाणापर्यत तरी विध्यार्थाना सांगितला पाहिजे बाबासाहेबांनी भारतीयासाठी केलेले काम ते ज्या परिस्थीतीतुन जगले ते सांगितले पाहिजे. त्यांची माहिती विध्यार्थाना दिलीच पाहिजे.
7 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे
रुढी परंपरा अंधंश्रध्दा असमानता आणि या गुलामगिरीच्या बेड्या तोडुन ज्यानी सर्वाना एकसारखे समान दर्जा दिला . ज्यांनी या देशाला राज्यघटना दिला हा देश ज्या घटनेनुसार चालतो . ज्यांनी आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार मिळवुन दिला . त्या विश्वरत्न बाबासाहेब ज्या दिवशी शाळेत गेले जेव्हापासुन त्याची शैक्षणिक कारकीर्द चालु झाली त्याचां पहिला दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर
मग हा 7 नोव्हेंबर आपण साजरा केलाच पाहिजे शासनाने जर शाळा काँलेज मध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी अधिकृत जीआर काढला असेल तर आपण ही त्याकरीता आपल्या जवळच्या शाळेत गेले पाहिजे. हा दिवस साजरा करण्याविषयी आपली भुमिका ही त्यासाठी पुढाकार घेणारी असली पाहिजे
ज्या दिवसापासुन बाबासाहेब शाळेत गेले तो दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर आणि ती शाळा आहे सातारा येथील सध्याचे प्रतापसिंह भोसले हायस्कुल
मराठीत एक म्हण आहे उंटावर बसुन शेळ्या हाकणे
म्हणजे लाबूनच त्या विषयावर बडबड करणे . त्या एखाद्या कामासाठी किंवा त्या ठिकाणी न जाताच त्याविषयी बडबड करणे . या वर्षी महाराष्टातील सर्वच शाळेमध्ये हा दिवस साजरा होणार आहे . आणि झालाच पाहिजे. त्यासाठी आपण या घटनेचा एक अधिकृत भाग झाला पाहिजे.
7 नोव्हेंबर च्या आधी जवळच्या शाळेत गेले पाहिजे.
बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन साजरा करावा आणि कसा करणार त्याविषयी संबधीत शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी बोलले पाहिजे
हे पहिले वर्षे आहे बरयाच शाळा किंवा शाळेतले मुख्याध्यापक सुट्टी घेत असेल कोणत्या तरी शिक्षकावर जबाबदारी टाकुन या कार्यक्रमापासुन दुर जातील. मग शाळेतले मुख्याध्यापक नाही मग कार्यक्रम घ्या नाहीतर घेऊ नका. किंवा फोटोला हार घातला एखाद्याने चार शब्द किंवा एखादे गाणे गायले किंवा कविता केली म्हणजे झाले असे ही करतील
हे पहिले वर्षे आहे. आपण ही ऐकमेंकाच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांना मानाने सन्मानाने बोलुन हा दिवस चांगल्या प्रकारे बाबासाहेंबाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा विध्यार्थाना सांगणारा पाहिजे
हार तुरे फोटो मोठमोठ्या भाषण बाजीपेक्षा बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाविषयी माहिती सांगितले पाहिजे. बाबासाहेबांनी केलेले लढे आंदोलने का केली?कशासाठी केली? त्यावेळी काय परिस्थीती होती. ? याची माहिती विध्यार्थाना सांगणारा बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन साजरा झाला पाहिजे
तसेच हा दिवस साजरा न करणारे काही महाभाग ही आहेत
त्यामुळे आपण एक बाबासाहेबांचे वैचारिक अनुयायी म्हणुन 7 नोव्हेंबर च्या आधीच आपल्या जवळच्या शाळेत जावे. तेथील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी आपण स्वतःहुन संपर्क करावा त्यांच्याशी या विषयी बोलावे. 7 नोव्हेंबर कशा पध्दतीने साजरा करणार आहे. त्यांचे मत आधी ऐकुण घ्यावे. नंतर आपणास काय वाटते ते त्यांना सांगावे. त्यामध्ये काही बदल किंवा अजुन चांगल्या पध्दतीने हा दिवस साजरा करण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांना सांगावे त्यासाठी विनंती केली पाहिजे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याशी चांगले वागले पाहिजे असो .
तर .
महाराष्टातील प्रत्येक शाळेत 7 नोव्हेंबर दिवस बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस साजरा झालाच पाहिजे . आणि तो ही समतेच्या विचारांच्या माध्यमातुन
. कारण सध्या RSS पुर्ण ताकद लावुनच आहे. RSSच्या दृष्टीकोनातुन बाबासाहेब विध्यार्थाना सांगायचे त्या वर ही आपण लक्ष दिले पाहिजे. बरयाच शाळेत बाबासाहेबांची पुस्तके असतील ही पण RSSच्या विचारामधील बाबासाहेब ते सांगतील तेव्हा लक्षात ठेवा आपण पुढच्या पिढीला बाबासाहेब जे होते समतेच्या विचारांचे बाबासाहेब विध्यार्थाना सांगितले पाहिजे.
त्याच पध्दतीने 7 नोव्हेबंर च्या आधी शाळेत एकदा जाऊन या पण
7 नोव्हेंबर ला ही आवर्जुन शाळेत जा . आपण प्रत्येक वेळेस बोललेच पाहिजे असे नाही . फक्त पहा , काही शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक बोलवणार नाहीत तरी ही अशा ही शाळेत जा शांत बसा . आपण एक बाबासाहेबांचे वैचारिक अनुयायी म्हणुन जा . खुप मोठा आव आणि भाव आणु नका शाळेतील शिक्षकावर दबाव आणु नका. हा दिवस सन्मानाने साजरा केला पाहिजे.
बाबासाहेब शिकले म्हणुन बाबासाहेबांनी काय काय केले यावर भर दिला पाहिजे . आणि त्या करीता शिक्षण किती महत्वाचे आहे यावर बोलले पाहिजे. त्यामुळे शाळेतील विध्यार्थानी शिकले पाहिजेच.
जर महाराष्टातील शाळेमध्ये 7 नोव्हेबर हा दिवस जर शाळेत साजरा केला जातो तर मग आपल्या समाजमंदिरात . आपल्या बुध्द विहारात . आपल्या घरात ही या दिवस ही साजरा झालाच पाहिजे. किमान त्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांपासुन महिलांना ही विहारात आपण घेऊन जावे . किंवा विहारात छोटासा कार्यक्रम ठेवावा. त्यांना बोलुन द्यावे. एक एक विचारांची जनजागृती खुप महत्वाची आहे. आपण पण आपल्या घरात गोड करुन या दिवस मस्त साजरा करावा.
आंनदाचा दिवस चांगल्या पध्दतीने साजरा केलाच पाहिजे.
पण
*7 नोव्हेबर हा दिवस आंनदात साजरा करतोच .पण ... त्याचबरोबर 7 नोव्हेबंर बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन साजरा करण्याबरोबरच आपण जर का खालील काही मुद्याकडे लक्ष दिले तरच आणि तरच आपण खरया आर्थाने बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन साजरा करण्यास आपण पात्र आहे*
शाळाबाह्य मुले आणि मुली
आजही महाराष्टात लाखो मुले शाळाबाह्य आहे. शाळेतच जात नाही . मग त्यासाठी ही आपल्यालाच काहीतरी करावयाचे आहे.
पुढील जुन मध्ये आपण किमान एकतरी मुल शाळेत गेलेच पाहिजे त्याकरीता प्रयत्न केलेच पाहिजे
आपण 7 नोव्हेबर जेव्हा आंनदाने साजरा करतो . तेव्हा समाज्यातील या शाळाबाह्य मुलाकडे ही पाहिले पाहिजे . ही मुले तुम्हाला नक्कीच वाडी वस्तीवर भेटतील नक्कीच काही झोपडपट्टीमध्ये भेटतील . त्या ठिकाणी ही आपण गेले पाहिजे . आपण आपल्या ग्रुप बरोबर जा किंवा वैयक्तिक जा . अशा शाळाबाह्य मुलांच्या आई वडीलांना किंवा नातेवाईक यांना सांगा . त्याच्या मानसिकतेत बदल केला पाहिजे . ती मुले शाळेत गेली पाहिजे या करीता आपले प्रयत्न निरंतर असले पाहिजे. फक्त 7 नोव्हेंबर आहे त्या दिवशीच केले पाहिजे असे नाही तर पुढील वर्षी जेव्हा शाळा चालु होते तेव्हा त्या मुलांना काही शैक्षणिक मदत लागली तर करा . पण ही मुले शाळेत गेलेच पाहिजे . ही शाळा बाह्य मुले शिकलीच पाहिजे . आजही हजारो वस्तीगृह महाराष्ट्रात आहेत . अशा मुलांना शिकण्यासाठी . त्यासाठी फक्त त्यांना सांगुन त्यांना पुढील वर्षी त्या मुलाना शाळेत जाण्यासाठी काही कागदपत्रे लागली तर जर शक्य असेल तर ती कागदपत्रे ही काढुन द्यावी. (जातीचा उत्पन्नाचा दाखला लागत असतो वस्तिगृहात प्रवेश घेण्यासाठी )
पहा आजही खेडे गावातील वाडी वस्तीवरील शिक्षणाचे प्रमाण खुप कमी आहे. शहरात राहणारयांनी पुढील जुन पर्यत जा एकद्या तरी वाडी वस्तीवर किंवा एकद्या झोपडीत जा मग समजेल तुम्हाला.
नाहीतर एकीकडे बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन साजरा करतो आणि एकीकडे लाखो विध्यार्था आज ही शिक्षण घेत नाही . त्या ही मुलाना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे हाच खरया अर्थाने बाबासाहेबांचे शाळा प्रवेश दिन साजरा होईल. आणि बाबासाहेबांच्या विचारांचे आपण वैचारिक अनुयायी म्हणवुन घेण्यासही आपल्याला ही अभिमान वाटेल
शिष्यवृत्ती 7 नोव्हेबर ला शाळेत तुम्ही जाणारच आहे तर मागील किमान 3 वर्षाचा आढावा घ्या विध्यार्थाना शिष्यवृत्ती दिली आहे कि नाही. शाळेत चांगल्या भाषेत विचारा उडवाउडवीची उत्तरे देतील पण तुम्ही ही मुख्य रेकार्ड पहा मागासवर्गीय किती मुले शिक्षण घेतात आणि किती मुलाना शिष्यवृत्ती दिली आहे.
या वर्षी तर सामाजिक न्याय विभागाचे 500 कोटी रुपये यांनी चोरले . हा आपल्या सर्वाचाच या सरकारने घात केला आहे.
या 500 कोटी रुपये हे आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना मुलासाठी शिष्यवृत्ती . यासाठी हा निधी होता. आता जर सरकारने आपले 500 कोटी रुपयेच पळवले तर विध्यार्थाना शिष्यवृत्ती कशी मिळणार आपल्या ज्या काही योजना होत्या त्यातील खुप योजना कमी केल्या आहेत.
तेव्हा यांनी जरी बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन या भावनिक विषयाला मान्यता दिली कारण त्यांना माहित आहे. या लोकांना भावनिक विषयात गुंतवले तर हे इतर गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अगदी तसेच झाले नाही आपले कोणी नेते 500 कोटी रुपये त्यांनी परस्पर वळवले तरी बोलले, चिकटुन राहिलेत गोचीडासारखे
समाजावर समाज्याच्या पैशावर जेव्हा असे सत्तेत असणारे आणि जर काही बोलले नाही तर अशा गोचीडांवर या 2019 च्या निवडणुकीत विषारी औषध मतदानरुपी फवारले पाहिजे. तेव्हा त्यांना समजेल गोचीडासारखे त्या गाईला चिकटुन राहायचे कि समाज्याचे 500 कोटी पळवले तेव्हा त्या गाईला चावुन रक्त काढायचे .गोचीडानो खुप काळ तुमची नाटके चालणार नाही असो
पुढील वर्षी जर काही आदीवाशी मुलांना शाळेत वस्तिगृहात अँडमिशन साठी माझ्याकडुन नक्कीच मदत होईल
असो
पुन्हा एकदा आपणा सर्वाना शाळा प्रवेश दिनाच्या खुप खुप सदिच्छा
बाबासाहेब आज शिकले म्हणुन मी सन्मानाने स्वाभिमानाने जगत आहे.
आणि बाबासाहेब तुम्ही होता म्हणुनच मी सन्मानाने श्वास घेत आहे. नाहीतर लाजारीतच पडलो असतो कितपत . आणि कंबरेला झाडु गळ्यात मडके आणि मेलेली गुरे ओढत असलो असतो.
कोठे उष्टे खात बसलो असतो . आणि घाणच पाणीही पित असतो
पण बाबा
आपण 7 नोव्हबर 1900 साली शाळेत गेला, खरच आम्ही धन्य झालो आज तुमच्या मुळे करोडो लोक सन्मानाने स्वाभिमानाने जगत आहेत. तुम्ही शाळेत गेला तुम्ही शिकले म्हणुन तुम्ही परिवर्तन केले.
बाबा तुम्ही आम्हास काय खावे ,कपडे कशी असावे इतक्या लहान लहान गोष्टीपासुन सांगितले म्हणुन तुमच्या विचारांशी गद्दारी तर कधी करणार नाहीच. आणि जर कोणी केलीच तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीच.
त्यामुळेच मी आणि माझ्यासारखे करोडो लोक तुम्हाला आज ही आमच्या जन्मदात्या आईवडीलांपेक्षा ही जास्त प्रेम करतात तुम्हुनच तुम्हाला आम्ही प्रेमानेच बाबा नाहीतर बाबासाहेबच बोलतो.
बस्स पुन्हा एकदा
फक्त तुमच्यामुळेच मी आज सन्मानाने जगत आहे.
तुम्ही शिकला म्हणुन
चला आपण सर्व मिळुन बाबासाहेब समजुन घेऊ आणि बाबासाहेब आचरणात आणु
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत