अॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य, मुंबई हायकोर्टाचे आदेश !

मुंबई : अॅट्रॉसिटीच्या कोणत्याही प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच व्हायला हवी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जांवरील निर्णयाच्या निमित्ताने हा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर आला होता.
स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या जातींना आजही बहुंजनांची शिक्षण प्रगती पाहवत नाही आणि या पोटसुळापोटी ते जीवघेणा त्रास देतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. पायल तडवी.
डॉ. पायलला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर व डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक झाली होती. त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करत सुनावणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या कायदेशीर तरतुदीचा आग्रह धरला होता. कायद्यातील तरतुदीप्रमाणे अॅट्रॉसिटीच्या कोणत्याही प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत