सर्वपक्षीय आमदारांचं मंत्रालयाला टाळं

मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, दुसरीकडे मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून, हातात फलक घेऊन आमदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे. आमदारांकडून चक्क मंत्रालयाला टाळे ठोकले.आज दुसऱ्या दिवशीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू केले होते.सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत