नोव्हेंबरची सुरुवात महागाईने, व्यावसायिक सिलिंडर महागला; जाणून घ्या सिलेंडरची किंमत किती?

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरवर महागाईचा बॉम्ब फुटला आहे. अशा परिस्थितीत आता १ नोव्हेंबर २०२३ पासून १९ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. मात्र १४.२ किलो एलपीजी सिलिंडर म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
व्यावसायिक सिलिंडर महागला iocl च्या वेबसाइटनुसार आजपासून आर्थिक राजधानी मुंबई व्यावसायिक सिलिंडरचा भाव पूर्वीच्या १६८४ रुपयांच्या तुलनेत १७८५.५० रुपये झाली आहे. तर इतर महानगरांबद्दल बोलायचे तर राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर १,८३३ रुपयांना उपलब्ध होईल, जो पूर्वी १७३१ रुपयांना मिळत होता. तर कोलकाता येथे १८३९.५० रुपयांऐवजी आता व्यावसायिक सिलिंडर १९४३ रुपये आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅसची किंमत १९९९.५० रुपये झाली आहे, जी आतापर्यंत १८९८ रुपये होती.
दिवाळीपूर्वी सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा धक्का बसला असतानाच घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर मात्र जैसे थेच राहिले आहेत, जी गृहिणींसाठी दिलासादायक बाब आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करत दिलासा दिला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत