मुख्यपानसंपादकीय

नळदुर्ग येथील शासकीय विश्राम गृहाची दयनिय अवस्था

अनेक वर्षापासुन धुळ खात पडुन प्रशासनाची डोळेझाक झाली पण आमदार व खासदारांनी लक्ष देण्याची गरज

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत असलेल्या नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे या शासकीय विश्रामगृह हे गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे त्याची खुप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आसल्याचे दिसुन येत आहे. शासकीय विश्रामगृहाच्या आतमधील परिसरात काट्याची झुडपे वाढले असून गवत व पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचला आहे.
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर आसुन या शहरांकडे प्रशासन आसुन आडथाळा नसुन खोळंबा आशी दयनिय अवस्था झाली आसून प्रशासन जाणीव पूर्वक या शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्याचबरोबर या ठिकाणी सफाई कामगार शिपाई किंवा चौकीदार नसल्यामुळे या विश्रामगृहाकडे नागरीकांचे येणे जाणे पूर्णपणे बंद झाल्यामुळे काही वर्षां पूर्वी डाक बंगला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नळदुर्गच्या शासकीय विश्रामगृहाची श्वानासह इतर  मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाची तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता करून विश्रामगृहाला गत वैभव प्राप्त करून द्यावी अशी मागणी होत आहे. नळदुर्ग येथे प्राचीन व ऐतिहासिक किल्ला आहे या ऐतिहासिक कल्ल्यात दररोज हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र रामतीर्थ आहे , संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भक्त नळदुर्ग नानीमाँ सरकार दर्गाहात येतात तसेच नळदुर्ग हे शहर तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे तुळजाभवानी माता व श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जाणारे भाविक तसेच ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटन नळदुर्ग शहरात आल्यानंतर विश्रांतीसाठी पूर्वी याच शासकीय विश्रामगृहात आराम घेण्यासाठी थांबत आसत मात्र सध्या हे विश्रामगृह बंद अवस्थेत असल्यामुळे नळदुर्ग शहरात येणाऱ्या पर्यटकासह भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आसल्यचे दिसुन येत आहे या विश्रामगृहामध्ये १ व्हीआयपी सुटसह ४ जनरल सुट आहेत. मात्र सध्या त्याची खुप मोठी दुरवस्था झाली आहे .
या शहराकडे खरे तर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जातीने लक्ष घालून हे ऐतिहसिक शहरातील अनेक वर्षापासुन धुळ खात पडून आसलेले विश्रामगृह तात्काळ चालु करण्या संदर्भात आदेश देण्यात यावा आशी मागणी शहरातील नागरीकानी केली आहे .
नळदुर्ग शहराचा ऐवढा मोठा विकास होतो मग शासकीय विश्रामगृह का चालू होत नाही आसे नागरीकातून बोलले जात आहे . आगर हे काम पूर्ण झाले तर शहराला एक गत वैभव प्राप्त होईल आणी नागरीकात समाधान व्यक्त केले जाईल .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!