
महाराष्ट्र शासन सेवेमध्ये कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई महागाई भत्ताचा लाभ लागू करण्यात आलेला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए फरकासह लागू करण्यात आलेला आहे . यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी अधिकृत शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या डीए वाढीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार , राज्यातील इतर सर्व शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2023 पासून महागाई भत्यामध्ये वाढ करणे संदर्भात वित्त विभाग कडून अधिकृत प्रस्ताव तयार करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे .
पुढील दोन दिवसांमध्ये निर्गमित होणार अधिकृत शासन निर्णय : राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ लागू करणेबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो . कारण ऑक्टोबर वेतन देयक अदा करण्यासाठी दि. 30 आणि 31 ऑक्टोबर हे दोनच दिवस शिल्लक असल्याने ,या दोन दिवसांमध्ये अधिकृत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो अशी विश्वसनिय सूत्रानुसार माहिती समोर येत आहे .
अधिकृत GR निर्गमित होऊनही ऑक्टोबर वेतनामध्ये मिळणार नाही वाढीव मागे भत्ता : पुढील दोन दिवसांमध्ये राज्य शासनाकडून महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित , झाल्यास ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयक सादर झाले नाहीत , अशा कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए वाढ लागून मिळेल . तर ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तत्पूर्वी सादर केली आहेत अशांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतन एका सोबत डी ए वाढ मिळेल . DA फरकाचा मिळणार लाभ : सदर महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यास , माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयकासोबत माहे जुलै 2023 पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येईल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत