मराठा आरक्षणाविषयी नेमलेल्या मंत्रिमंडळ समितीचा अहवाल शासनाला सादर.

उपसमितीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली; त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आऱक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आज राज्यशासनाला प्राप्त झाला असून समितीने आतापर्यंत १ कोटी ७३ लाख कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत दिली. समितीला आतापर्यंत ११ हजार ५३० जुन्या नोंदी आढळल्या असून काही कागदपत्रं हैद्राबादच्या अभिलेखागारातून मिळवायची आहेत; त्या करता समितीला २ महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
समितीचा आतापर्यंतच्या कामाचा अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाईल, असं ते म्हणाले. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून देणं आणि सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकेच्या मार्गानं आरक्षण मिळवून देणं अशा दोन्ही आघाडयांवर सरकार कार्यरत असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि इतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं, शासनावर विश्वास ठेवावा, असं आवाहन शिंदे यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत