सांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण…? अनिता देशमुख सरदार

खळगी भरते आज खोट्या राजकारणांची
कर्जाच्या ढिगार्याखाली मरतो आहे शेतकरी
घेईल कोण दाद मरणासन्न अवस्थेची
नवयुकांच्या पदव्या मागतात रोज माधूकरी
सांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण….? १
रोजगारीच्या प्रश्नांची भूक रातंदिन सतावते
टाहो फोडतात डिगऱ्या हुंदके आहेत दाटलेले
मस्त वाल्यांचा बाजार दिवसेंदिवस वाढतो आहे
वणवण फिरणाऱ्या तरुणांचे श्वास आहेत कोंडलेले
सांगा कुठल्या स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण ….? २
ढवळ्या दिवसा कोवळ्या कळ्यांवर होतो आहे बलात्कार
आंधळी पट्टी बांधून बसली आहे न्यायदेवता सरकार
पैशांच्या जोरावर अपराधी मोठा मोकाट सुटतात
त्यांच्या अन्यायाचा आक्रोश मागतो आहे न्याय आजवर
सांगा कुठले स्वातंत्र भोगतो आहोत आपण….? ३
महाशक्तीचे स्वप्न भंगून पडले दलालांच्या खिशात
कणग्या भरतात व्याजाने हव्याशी व्यापारी वर्गदार
बहुरंगी झालेत प्रश्न त्यांच्या उत्तरांचा रंग कोणता ?भ्रष्टाचाराचा काळा डाग आहे त्यांच्या भाळावर
सांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण ….? ४
देशाच्या विकासाचा दर मंदावला आहे फार
विचारहीन मतदार मतदानाला आहे जाणार
फिरा अनवाणी तुम्ही त्यांच्या गाड्यांचा निघतोय धूर
रक्ताने माखलेल्या पाऊलखुनांना कोण आहे हो बघणार ?
बा भीमाने दिलेला अधिकार सांगा कोण खरा बजावणार ?
सांगा कुठले स्वातंत्र्य बघतो आहोत आपण….? ५
अनिता देशमुख सरदार
नांदुरा ( बुलढाणा)
हमु. कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत