आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपान
देशभरातल्या करदात्यांच्या प्राप्तीकर विवरणपत्रांच्या रकमेत ९० टक्क्यांची वाढ

देशभरातल्या करदात्यांनी भरलेल्या प्राप्तीकर विवरणपत्रांच्या रकमेत २०१३-१४ पासून २०२१-२२ या कालावधीत ९० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१३ – १४ मध्ये ही रक्कम ३ कोटी ३६ लाख रुपये होती, जी आता वाढून ६ कोटी ३७ लाख झाली आहे. या कालावधीत करदात्यांच्या सरासरी स्थूल एकंदर उत्पन्नात ५६ टक्के वाढ झाली असल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे. २०२३-२४ या वर्षासाठी आत्तापर्यंत ७ कोटी ४१ लाखांपेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यात आली आहेत, ज्यापैकी ५३ लाख जणांनी पहिल्यांदाच हे विवरणपत्र दाखल केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत