बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे संपन्न.

दिनांक .२४ ऑक्टोंबर ( नागपूर)
प्रतिनिधि प्रा. डी. बी .धावारे
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी अशोका विजयादशमी दिवशी नागपुरात ललित कला भवन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पॉक्स कॉलनी इंदरा चौक येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन हरीवंत विर्दी ( बुध्द धम्म असोसिएशन लंडन) यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून डॉक्टर विलास खरात ( राष्ट्रीय प्रभारी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नवी दिल्ली) प्रताप चाटसे ( इंटरनॅशनल समन्वयक बिन) हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून विकास चौधरी पटेल ( राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा, नई दिल्ली), भिखूनी संघ मित्रा, अड.सिद्धार्थ ( प्रभारी कर्नाटक बिन) मिलिंद बौध्द ( प्रदेश प्रभारी), भंते सोमनंद ( केंद्रीय अध्यक्ष, भिक्खू संघ) आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात, ‘रामायण दशरथ जातक कथा व महाभारत पत जातक कथांची चोरी_ एक चिंतन, रामायण महाभारत हे ग्रंथ बौध्द धम्म प्रतिक्रिया म्हणून लिहण्यात आले एक चिंतन, आरएसएस ज्या हिंदुत्वाची गर्जना करत असतो तो ब्राह्मण वाद आहे _ एक चिंतन, डी. एन. ए. आधारित मूलनिवासी राष्ट्रवादीसोर ब्राह्मणी खोटा राष्ट्रवाद टिकू शकत नाही. एक चिंतन या विषयावर मान्यवरांनी आपले अभ्यास पूर्ण विचार मांडले. ललित कला भवन, इंदोरा चौक या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जागे अभावी हॉल च्या बाहेर स्क्रीन बोर्ड लावला होता अर्चना चंदन शिवे यांनी सूत्र संचालन केले, तर सुनीता कसबे वैशाली राक्षे महीला प्रभारी यांनी आभार प्रदर्शन केले. बामसेफ अपसूट विंगाच्या पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत