मुख्यपान
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण.

अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच शिर्डी इथं सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचंं आज दुपारी शिर्डीत आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. शिर्डी इथल्या श्रीसाईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी नवीन दर्शन संकुलाचं उद्घाटन केलं. याखेरीज ‘नमो शेतकरी महासन्माननिधी योजने’चा प्रारंभ प्रधानमंत्री करतील. राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. संध्याकाळी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोव्याकडे रवाना होतील. |
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत