विकास कामं नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीनं पूर्ण करण्याचे अजित पवार यांचे निर्देश

नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीपथावरील आणि प्रस्तावित विकास कामं नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. पुणे मेट्रोच्या कामाला गती, साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक चतुर्थ श्रेणी पदांना मंजुरी, अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक निधी, यासह राज्यभरातील महत्त्वाची कामं मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसंच त्यांनी निर्माणाधीन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत