महाराष्ट्रमुख्यपान
महाराष्ट्रातल्या २० खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार.

बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन इथं झालेल्या विशेष ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी भरघोस पदकं जिंकणाऱ्या, महाराष्ट्रातल्या २० खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राजभवनात सत्कार करण्यात आला. बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदकं मिळवणं हा राज्यासाठी तसंच देशासाठी बहुमान आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारतातून एकंदर ११४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी जिंकलेल्या २०२ पद्कांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या २० पदकांचा समावेश आहे. या ऑलिम्पिकमध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती स्पेशल ऑलिम्पिकच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमैया यांनी दिली. या स्पर्धा बर्लिनमध्ये जून महिन्यात झाल्या. |
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत