
जम्मू आणि काश्मीर सीमेवर कुपवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून,हा पुतळा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाड्याकडे रवाना करण्यात आला.हा पुतळा राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबरला मुंबईतून रवाना झाला होता.मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेकडून हा पुतळा उभारण्यात येत आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७ नोव्हेंबरला या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत