
६७व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काल नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. यावेळी २२ प्रतिज्ञांचं वाचन करुन, समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन, बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. दीक्षाभूमीवर काल संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथल्या जीवक बुद्ध विहारात रांगोळीतून बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे. ५ तास खर्चून रेखाटलेली ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बुद्धलेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना, पंचशील प्रार्थना घेण्यात आली. या कार्यक्रमाला जपानचे धर्म गुरू इको काचो उपस्थित होते. बौद्ध धम्म समजून घेण्याचं आवाहन इको काचो यांनी यावेळी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत