स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या पायर्यांविषयी माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. शिवाय, उमेदवारांनी सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याच्या सूचना एसबीआयच्यावतीने देण्यात आल्या आहेत. एसबीसी स्पेशालिस्ट ऑफिसर भरती २०२३ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, भरतीअंतर्गत ४३९ पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. भरतीद्वारे व्हाइस प्रेसिडेंट, असिस्टंट जनरल मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर २०२३ पासून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत.
ज्या उमेदवारांनी अद्याप भरतीसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करण्याचा सल्ला एसबीआयच्या वतीने देण्यात आला आहे. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांना सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण चुकीचा भरलेला फॉर्म एसबीआय स्वीकारणार नाही.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्लूडीसाठी अर्ज विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. शुल्काचा भरणा फक्त ऑनलाइन स्वीकारला जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत