महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांचे रुग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश.

काल छत्रपती संभाजीनगर इथं महिला आणि बालविकास विभागाचा विभागीय आढावा घेतल्यानंतर महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.
बालमृत्यू रोखण्यासाठी संस्थागत रुग्णालयांमधेच प्रसुती करावी, यासाठी विशेष मोहिम राबवण्यातचे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
अंगणवाड्याची संख्या, मागणी आणि पदभरती, इमारत इतर पायाभूत सुविधांविषयीचा आढावाही तटकरे यांनी यावेळी घेतला. लेक लाडकी योजनेअंतर्गत विभागाने जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत आणि लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, भाऊबीज निधी, स्मार्ट अंगणवाड्या याबाबतही दिवाळीपूर्वी काम पूर्ण करावेत, असे निर्देश तटकरे यांनी दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत