मिशन गगनयानची पहिली चाचणी यशस्वी;अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित.

श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून काल भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रोच्या मिशन गगनयानची पहिली चाचणी यशस्वी झाली. गगनयानच्या ‘टीव्ही डी वन’ या क्रू-मॉड्यूलचं चाचणी उड्डाण करण्यात आलं. काल सकाळी यानाचं चाचणी उड्डाण तांत्रिक त्रुटींमुळे तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं, मात्र या त्रुटी तातडीनं दुरुस्त करून, उड्डाण करण्यात आलं, ते यशस्वी ठरलं.
गगनयानच्या ज्या भागात अंतराळवीर असतील तो भाग ठराविक उंची गाठल्यावर नियोजनानुसार बंगालच्या उपसागरात कोसळला. नौदलाच्या पाणबुड्यांनी तो भाग नौदलाच्या जहाजावर व्यवस्थितपणे पोहोचवला. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत