दक्षिण मध्य रेल्वे नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालवणार.
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वनं नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर सोमवारी आणि बुधवारी नांदेडहून सव्वा नऊ वाजता सुटेल, तर परतीच्या प्रवासात मुंबईहून दर मंगळवारी आणि बुधवारी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल. ही गाडी वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या मार्गे धावणार आहे. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते काकिनाडा दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे, ही रेल्वे आज दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी नांदेडहून तर परतीच्या प्रवासात उद्या २२ तारखेला रात्री नऊ वाजता काकिनाडा इथून सुटणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत