अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गांजा आढळून आला.
अमरावती येथील येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गांजा आढळून आला आहे. कारागृहातील जनरल सुभेदार प्रल्हाद लक्ष्मण इंगळे (५५) हे गुरुवारी आतील बाजूस हायवे समांतर तटाच्या भिंतीलगत टॉवर क्रमांक २ ते ३ क्रमांक दरम्यान संचारफेरी करीत होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा चेंडू दिसून आला. त्यांनी त्या चेंडूचे निरीक्षण केले. त्यावेळी त्या चेंडूत त्यांना १९ ग्रॅम गांजा आणि दोन नागपुरी खर्ऱ्याच्या पुड्या आढळल्या. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने याबाबतची माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना दिली. त्यानंतर कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत