हलबा समाजावर अन्याय, राष्ट्रीय आदिम कृती समितीचे आज आंदोलन.
संविधानिक न्यायापासून सरकारने हलबा, माना, गोवारी, धनगर, धोबा, ठाकूर या आदिवासी समाजाला वंचित ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौक, नागपूर येथे आज सायंकाळी ५.३० वाजता आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा कृती समितीने केली.याबाबत ॲड. नंदा पराते म्हणाल्या, शासनाने ४५ जमातींपैकी हलबा, माना, गोवारी, धनगर, धोबा व ठाकूर या आदिवासी जमातींसह ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेरील असल्याने त्यांना संविधानिक न्यायापासून वंचित केले. त्यामुळे हलबा समाजमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे भाजप सरकार विरोधात आंदोलनातून रस्त्यावर आक्रोश केला जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत