रेल्वे स्थानकावरील स्टाॅल देण्याच्या बहाण्याने चारजणांची फसवणूक; महिलेविरोधात गुन्हा दाखल.
एका महिलेने चार जणांची १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्थानकावरील स्टाॅल निविदेच्या माध्यमातून मिळवून देतो असे आश्वासन त्या महिलेने दिले होते. फसवणूक झालेले व्यक्ती हे ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ भागातील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओळख एका व्यक्तीसोबत झाली होती. आपण रेल्वेत अभिंयता असून त्यांची वेदांत सर्व्हिस या नावाने कंपनी आहे. रेल्वेत निविदेच्या माध्यमातून वेगवेगळे स्टाॅल मिळवून त्याद्वारे व्यवसाय करू असे त्यांनी चारजणांना सांगितले. त्यामुळे चारही जणांनी त्यांना निविदेची रक्कम भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे देण्यास सुरूवात केली. परंतु मे महिन्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे व्यवहार पाहण्यास सुरूवात केले. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी त्यांच्या पत्नीला पैसे देण्यास सुरूवात केली.
काही दिवसांनी फसवणूक झालेले व्यक्ती त्यांचे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. काही दिवसांनी कंपनी कार्यालय बंद असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चारही जणांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत