आता ‘एका क्लिक’वर! शासकीय रुग्णालयांतील रुग्णांची माहिती…
जुलै २०२२ मध्ये राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचआयएमएस) सेवा बंद पडली. तेव्हापासून सर्वत्र ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ आहे. शासनाने आता ऑनलाईन नोंदणी साॅफ्टवेअरचे काम राष्ट्रीय माहिती केंद्राला दिले. त्यामुळे लवकरच राज्यात पुन्हा रुग्णांची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची वेगवेगळी शासकीय रुग्णालये आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत कमी गंभीर तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या ‘टर्शरी’ दर्जाच्या रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण दाखल होतात. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील सर्व रुग्णांच्या नोंदी पूर्वी ‘एचआयएमएस’ प्रणाली यंत्रणेतून ऑनलाईन पद्धतीनेच होत होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत