
इस्राईलच्या लष्कराकडून जमिनमार्गे हल्ला होण्याची टांगती तलवार कायम असल्याने सामान्य नागरिकांचे स्थलांतर अद्यापही सुरुच आहे. गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे. अन्न-पाण्याच्या कमतरतेमुळे या नागरिकांचे अत्यंत हाल होत असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.
इस्राईलने उत्तर गाझामधील लोकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घर सोडून निघून जात आहेत. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यापैकी किमान पाच लाख नागरिक संयुक्त राष्ट्रांनी उभारलेल्या शाळांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आश्रयाला आहेत.
इस्राईलने गाझा पट्टीचा वीज, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा थांबविला असून युद्धामुळे अन्नाचाही तुटवडा आहे. त्यामुळे स्थलांतरितांना पाण्याची आणि अन्नाची प्रचंड कमतरता भासत आहे. संयुक्त राष्ट्रांकडून मदत पुरविण्याचा प्रयत्न सुरु असला तरी इस्राईलच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे सर्व जणांपर्यंत मदत पोहोचविणे अवघड असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत