भारताला लोक राष्ट्र निर्माण करने काळाची गरज- डॉ भीमराव मस्के

विषमते विरूध्द संघर्ष करून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय प्राप्तीसाठी पीपल्स पॅन्थर कटीबध्द आहे. अनेक जाती, धर्म, भाषा व संस्कृतीने नटलेला भारत देश हा संघराज्य आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील लोकराष्ट्र सामाजिक,आर्थिक, राजकियजिवनात संविधा नी क मार्गाने,सांस्कृतिक परिवर्तन करून जनकल्याणाकरीता लोकराष्ट्र निर्माण करणे काळाची गरज असल्याचे ■ प्रतिपादन पीपल्स पॅंथरचे नवनिर्वाचीत प्रदेश अध्यक्ष डॉ भीमराव मस्के यांनी ■ रवीभवन, नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले. १५ ऑक्टो ला रविभवन, 5. नागपूर येथे कार्यकर्ता बैठक घेऊन डॉ । मस्के यांची प्रदेश अध्यक्ष पदा करीता एकमताने निवड करण्यात आली. हे पद अशोकभाऊ मेश्राम यांच्या = निधनामुळे रिक्त होते. ■ खाजगीकरणामुळे भांडवलशाहीला चालना मिळेल व गरिबी अधिक वाढेल त्यामुळे गरिबांचे शोषण होण्याची भिती आहे. त्यांना शिक्षणापासून व रोजगारापासून वंचित राहावे लागेल.
या बैठकीमधे पॅन्थर म आघाडी अध्यक्षा सविता घोडे, डॉ प्रतिभा मस्के, शैला जवादे, जिल्हा अध्यक्ष संदीप बलवीर, जिल्हा महासचिव डॉ विजय शेळके, संघटक गणेश सोनटक्के, वर्धा जि. अध्यक्ष मधुभाऊ ओरके, बंडूभाऊ कदम, विदर्भ सचिव शेषराव गणवीर नागपूर शहर उपाध्यक्ष गौतम सातपूते, भाऊ मस्के, सचिव डॉ गिरीधारी धापोडकर ना. ता. अध्यक्ष डॉ प्रदीप मेश्राम, सचिव भीमराव बोरकर, प्रा, आनंद मेश्राम, दुर्वास चौधरी, गौतम थुलकर, विनोद मुन, प्रविण डोइफोडे, यु.एन. बोरकर, रूषिकांत मेश्राम , अनिल गायकवाड इ. अनेक कार्यकर्ते ऊपस्थित होते. तर यावेळी विशेष मार्गदर्शन भूपेशथुलकर, दादाकांत धनविज चंद्राभाऊ ठाकरे व ऍड लटारू मडावी यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत